ज्येष्ठ नागरिकांचे लेखन नव्या पिढीसाठी मार्गदर्शक : डॉ. दाभोलकर

कौशिक प्रकाशनच्या लेखन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा

सातारा – वैचारिक, अनुभवपूर्ण लेखनातून सजगता, सृजनशीलता आणि सर्जनशीलता वृृध्दींगत होत आहे. अरुण गोडबोले यांच्या कार्याची नोंद ही गिनीज बुकात होण्यासारखी आहे. असे उद्‌गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ,विचारवंत, समीक्षक आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले. सातारा येथील अरुण गोडबोले यांच्या कौशिक प्रकाशनच्यावतीने घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या लेखन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून दाभोलकर बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या या सोहळयात अरुण गोडबोले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, उपाध्यक्ष सुधीर धुमाळ, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अरुण गोडबोले म्हणाले की, अशा कार्यक्रमातून मराठी भाषेचे संवर्धंन यातून हा प्रतिसाद वाढत आहे. संपूर्ण राज्यातून 126 लेख प्राप्त झाले यामध्ये महिलांचा 70 टक्के सहभाग होता. या स्पर्धेतील लेखांचे परीक्षण प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले. या स्पर्धेंत मुंबई, नागपूर, पुणे, गोवा, सांगली,अकोला, चिपळूण, बेळगाव, किर्लोस्कवाडी आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले. यावेळी सर्व मान्यवर तसेच स्पर्धेचे परीक्षक श्रीधर साळुंखे यांचा सत्कार अरुण गोडबोले यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन केला.

प्रथम पुरस्कार प्रत्येकी 1000 व सन्मानपत्र, छाया सिध्देश्‍वर वाघ व प्रिया विश्‍वनाथ पै, औंध पुणे यांना तर द्वितीय पुरस्कार मोहन आळतेकर किर्लोस्करवाडी व वीणा मिसर नागपूर यांना, तृतीय पुरस्कार विनया वाळींबे एरंडवणे पुणे व रमेश गजानन पांडया, कर्वेनगर पुणे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ 10 बक्षिसात मधूकर केळकर गोवा, मंगला मुंजे अकोला, कादंबरी देशमुख सातारा, भालचंद्र सोहोनी बेळगाव, अशोक दरेकर सातारा, शरद भोंडे कोरेगाव, रजनी देशपांडे सातारा, शामकांत रेघे पुणे, चंद्रकांत गिते सातारा व आशा प्रभाकर जोशी सातारा यांना प्रदान करण्यात आले. यावेळी या स्पर्धेसाठी विशेष परीश्रम घेणारे प्रदीप चव्हाण, अनीता दाभाडे आणि जयवंत नारकर यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विजेत्या स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्‍त करताना या स्पर्धेत मिळणारा सन्मान हा उतारवयातही प्रेरणा देणारा व मोठी निखळ आनंदाची अनुभूती देणारा आहे, लेखनाची संधी या स्पर्धेमुळे मिळाली.प्रगतीच्या आड कोणताच अडथळा येत नाही हे या बक्षीसातून आम्ही दाखवू शकलो असे उद्‌गार काढले. यावेळी चंद्रकांत गिते, छाया वाघ, प्रिया पै ,कादंबरी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. तर 94 वर्षीय मारूती महामुनी यांनी याच समारंभावर केलेली कविता सादर केली. समारंभाचे सुत्रसंचालन सुधीर धुमाळ यांनी केले.तर आभार डॉ. अच्युत गोडबोले यांनी मानले. समारंभास माजी प्राचार्यं पुरुषोत्तम शेठ,कवी आनंदा ननावरे, गौतम भोसले, वाय. के. कुलकर्णी, विजय रणदिवे, सुभाष देशमुख, अविनाश लेवे सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदींची मोठी उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)