ज्येष्ठ चिनी जनरलची पदावनती – भ्रष्टाचार व मुलीच्या विवाहाचे कारण

बीजिंग (चीन) – चिनी लष्कराचे दुसऱ्य दर्जाचे अधिकारी जनरल चाई यिंगटिंग यांची पदावनती करण्यात आलेली आहे. त्यांना जनरलपदावरून 8 पदांची पदावनती करत बटालियन कमांडर करण्यात आले आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांशी संबंध आणि त्यांनी आपल्या मुलीचा एका फ्रेंच नागरिकाशी केलेला विवाह हे त्यांच्या पदावनतीचे कारण सांगितले जात आहे.

हॉंगकॉंगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 674 वर्षीय जनरल चाय यांना सेना प्रमुखपदावरून काढून टाकून 8 पदे खाली बटालियन प्रमुख करण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्याप काही अधिकृत माहिती देण्यात्‌ आलेली नाही. अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चाई यिंगटिंग यांना जनरल बनवले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)