ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे वृद्धापकाळाने निधन

कोलकाता: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी राहत्या घरी सकाळी साडेदहा वाजता अखेरचा श्‍वास घेतला. त्यांचे वय वर्षे 95 होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. सेन यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्‍त होत आहे. सेन यांच्या निधनावर राजकीय, सांस्कृतिक जगतातून शोक व्यक्‍त करण्यात येत आहे.

मृणाल सेन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मृणाल सेन यांचा जन्म 14 मे 1923 मध्ये फरीदपूर येथे झाला. हे शहर सध्या बांगलादेशमध्ये आहे. मृणाल सेन यांनी सर्वाधिक बांगला भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट “मृगया’चे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मृणाल सेन यांना 20 राष्ट्रीय आणि 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)