ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे- गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीने ही निवड केली आहे. बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, सरोदवादक पंडीत अमजद अलीखान, गायक पंडीत जसराज, संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचाही गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. पुरस्काराचे यंदाचे हे 30 वे वर्ष आहे. नगरीतील ग्रामदैवतांसह बालशिवाजीची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह, एक लाख रुपयांची थैली असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या आधी ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै. जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रॅंट, नृत्यांगना दॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं. ढेरे, डो. ह. वि. सरदेसाई, निर्मलाताई पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पुनावाला, प्रताप पवार, भाई वैद्य, डॉ. के. एच. संचेती यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. रघुनाथ लकेश्री, बलबीर सिंग, संदीप उकिरडे, विनिता कामटे, दीनदयाळ वर्मा, प्रल्हाद रेभे अशी सत्कारार्थींची नावे आहेत. यातील लकेश्री यांचे वय 107 असून, त्यांनी 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. वल्लभभई पटेल, युसूफ मेहेरअली यांच्याशी त्यांचा विशेष परिचय होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)