मुंबई – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ठरलेल्या “आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का अर्थात शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांना न्याय देणाऱ्या शुभांगी जोशी यांनी अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. “आभाळमाया’ असो किंवा “काहे दिया परदेस’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय साकारला होता.

दरम्यान, सध्या कलर्स वाहिनीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)