ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन  

मुंबई –  ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे मुंबई निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शुभांगी जोशी यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली व आज पहाटे त्यांचे निधन झाले.

झी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत साकारलेली गौरीच्या आजीच्या भूमिकेने शुभांगी जोशी यांना मराठी रसिकांच्या घराघरात पोहचवले. मालवणी भाषेतील संवाद, आपल्या जावई म्हणजेच मोहन जोशी यांच्याशी उडणारे खटके प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. याशिवाय ‘आभाळमाया’ या मालिकेतही त्यांनी महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. शुभांगी जोशी सध्या ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेत काम करत होत्या. त्यांच्या जाण्याने सहकलाकारांना धक्का बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)