ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन 

पुणे – प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटकातल्या लालन यांच्या भूमिका गाजल्या आहेत. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटांत तसेच ‘रथचक्र’ या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले आहे. त्यांनी नाटकामागील नाट्य हे पुस्तकही लिहिले होते. कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद लालन सारंग यांनी भूषविले होते. त्यांना अनेक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)