ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन  

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही आणि जाहिराती अशा विविध माध्यमातून किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. किशोर प्रधान यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षणाचा आयचा घो, लालबाग परळ, भिंगरी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. याशिवाय, लगे रहो मुन्नाभाई, जब वुई मेट या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम मनात राहिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)