ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई: बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कादर खान हे आपला मुलगा सरफराज आणि सून शाईस्तासोबत कॅनडामध्ये राहात आहेत. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्‍लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांच्या मेंदूचे काम करणे बंद झाले आहे. ही माहिती कादर खान यांना मुलगा सरफराजने दिली आहे. डॉक्‍टर त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत. मात्र, श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावतच गेली. दरम्यान, कादर खान यांनी “दाग’ या चित्रपटापासून कारकिर्दीला सुरुवात केली. 43 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच 250 हून अधिक चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)