ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी : अमिताभ बच्चन

मुंबई – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती गंभीर असून त्यांचावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. कादर खान यांना ‘प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर’ हा आजार असल्याने मेंदूवर याचा मोठा परिणाम झाल्याची बातमी आहे. कादर खान यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी इच्छा ‘बिग बी अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या  ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘सुहाग’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कुली’,शहेनशाह’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांनमधून या दोघांनी एकत्र काम केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी  ट्विटर संदेश करत, कादर खान यांच्या सोबत काम  करताना खूप मजा यायची  त्यांच्या  सोबत काम केलेले दिवस हे आयुष्याला आनंद देणारे दिवस आहेत. माझ्या अनेक चित्रपटांचे त्यांनी लेखन केले आहे. त्याच्या सहवास नेहमीच हवा हवासा वाटतो. त्यांच्या  प्रकृतीत जोमाने  सुधारणा  व्हावी अशी इच्छा त्यास्नी आपल्या ट्विटर वरून व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)