ज्येष्ठावरच्या जाचक अटी बॅंकानी त्वरीत थांबवाव्यात-डॉ.हंसराज वैद्य

प्रातिनिधिक छायाचित्र

नांदेड, दि. 20 (प्रतिनिधी) – काही बॅंकाचा संदेश सर्वांच्याच मोबाईलवर काही दिवसापूर्वी आलेला आहे. एकीकडे शासन बॅंकेत ज्येष्ठांसह सर्वांनाच बॅंकेच्या खात्यावर शुन्य रक्कम असतानाही खाते उघडण्यास व सर्व कॅशलेस व्यवहार करण्यास प्रवृत्त करत आहे आणि दुसरीकडे बॅंका संदेश पाठवून ज्येष्ठांवर अन्याय करत आहेत. यामध्ये पेंशनधारक ज्येष्ठांच्या खात्यावर किमान 3000 कायमची ठेव म्हणून ठेवणे आवश्‍यक असल्याचे नमुद करत आहेत. एवढेच नव्हे तर खात्यावर पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांना 3000 किमान स्वतःच्या खात्यावर कायम ठेव म्हणून ठेवा अन्यथा दंड भरण्यास तयार रहा, अशा प्रकारचा एक प्रकारे दम वजा एस.एम.एस. मोबाईलवर टाकण्यात आल्याचे ज्येष्ठांकडून सांगितल्या जात आहे.

एकीकडे खात्यावर शुन्य रक्कमेवर खाते उघडण्यासाठी प्रवृत्त केल्या जात असताना वरील प्रकारे दम वजा मॅसेज आल्याने सर्वच ज्येष्ठ नागरिक भयभीत झालेले आहेत. पेंशनधारक हे अत्यल्प, मध्यम, चांगले आणि उत्तम पेंशनधारक अशा प्रकारचे आहेत. जे पेंधनधारक अत्यल्प व मध्यम पेंशनधारक म्हणजे काहींना रू.700 ते 800 तर काहींना 1200 ते 1500 रू.मिळतात, असे पेंधनधारक आहेत. ते कसेबसे जीवन जगतात अशा ज्येष्ठ नागरिकांना खात्यावर कायम ठेव म्हणून 3000 ठेवा अन्यथा दंड म्हणजे ही जाचक अट कशासाठी? एवढेच काय चांगल्या पेंशनधारकांना आवश्‍यक खर्च केल्यानंतर खात्यावर 3000 असलेच पाहिजे, असा दम भरणे म्हणजे सुद्धा अन्यायकारक नाही का? तेंव्हा बॅंकानी ही जाचक अट रद्द करावी व पूर्वीप्रमाणे फार तर 500 रूपये किमान ठेवावेत, असे करावे अन्यथा त्या बाबतीत ज्येष्ठांना विचारच करावा लागणार आहे, असे डॉ.हंसराज वैद्य यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)