ज्येष्ठाच्या हातातील साडेपाच हजार लांबविणाऱ्याला तुरूंगवास

पुणे- भजी घेण्यासाठी थांबलेल्या ज्येष्ठाच्या हातातील साडेपाच हजार रुपयांचा पैशांचा बंडल हिसकावून चोरणाऱ्याला 1 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला. अमोल जीवराज पिल्ले (वय 38, रा. येरवडा), असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंडीबा मारूती धिवार (वय 66, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्वाची ठरली. फिर्यादी हे दि. 12 एप्रिल 2018 रोजी त्यांना मिळत असलेले पेन्शनचे पैसे काढण्यासाठी ढोले पाटील रत्यावर असलेल्या महाराष्ट्र बॅंकेत गेले होते. पैसे काढल्यानंतर ते येरवडा परिसरातील एका हातगाडीवर नातवासाठी भजी घेण्यासाठी थांबले होते. पिल्ले देखील त्यावेळी तेथे भजी खात होता. भजी घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी फिर्यादी यांनी खिशातून पैशांचा बंडल काढला. 100 रुपये हातगाडी चालकाला दिले. त्यावेळी पिल्ले याने “तुला, कशाला पैसे लागतात’, असे म्हणून फिर्यादींच्या हातातून साडेपाच हजार रुपये हिसकावून पळ काढला. याबाबत धिवार यांनी येरवडा पोलिसांत फिर्यादी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पिल्ले याला अटक केली. तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पिल्ले याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी आणि मारहाणसारखे तब्बल 55 गुन्हे दाखल आहेत. तो सराईत असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्‍तीवाद ऍड. कोळी यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)