ज्येष्ठांनी केली अष्टविनायक यात्रा

मंचर -अष्टविनायक सहलीमुळे मंचर शहर जेष्ठ नागरिक संघातील काही सदस्यांनी प्रथमच अष्टविनायकाची पूर्ण यात्रा पार पडल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या सहलीमध्ये प्रवास, भोजन व निवासाची उत्तम सोय झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केल्याची भावना मंचर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत थोरात व सचिव रंगनाथ थोरात यांनी व्यक्त केली.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी 101 ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसांची मोफत अष्टविनायक सहल घडवून आणली. यात्रेच्या नियोजनापासून व यात्रा सुरळीतपणे पार पडणे कामी मंचर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रंगनाथ थोरात, संघाचे कार्यकारी सदस्य बळीराम खरमाळे, सुदाम बेंडे, नामदेव बाणखेले, लक्ष्मण गांजाळे, मंचर सोसायटीचे अध्यक्ष अरूण लोंढे, गणपतराव कराळे, सुमन बाणखेले, प्रमिलाताई निऱ्हाळी संघाचे मार्गदर्शक व ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखेले, ग्रामपंचायत सदस्या सविता क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच दत्ता गांजाळे यांचे सहकार्याचे व योगदानाबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी सर्वाचे वतीने सत्कार केला. अधिक मासानिमित्त महाराष्ट्र दर्शन सहल घेण्याचे नियोजन असल्याचे मंचर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रंगनाथ थोरात यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)