ज्येष्ठांच्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी पटकावले अजिंक्‍यपद 

सलग चौथ्या वर्षी विजेतेपद 
पुणे: एकतर्फी ठरलेल्या अंतिम सामन्यात प्रकाश सोलापूरकर यांचा पराभव करताना अशोक केदारी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकावले. सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक कॅरम क्‍लबच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
केदारी यांनी सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा जिंकून प्रशंसनीय कामगिरी केली आहे. अशोक केदारी यांनी अंतिम सामन्यात प्रकाश सोलापूरकर यांचा 25-5, 25-6 असा सहज पराभव करताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. त्याआधी उपान्त्य फेरीच्या सामन्यात केदारी यांनी राम जोशी यांचा 25-3, 25-7 असा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तसेच दुसऱ्या उपान्त्य लढतीत प्रकाश सोलापूरकर यांनी सुधाकर पंडित यांच्यावर 25-12, 25-10 अशी मात केली होती. राम जोशी यांनी तृतीय क्रमांक, तर सुधाकर पंडित यांनी चतुर्थ क्रमांक पटकावताना चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत एकूण 58 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल दातार यांच्या हस्ते पार पडले. सिंहगड रोड ज्येष्ठ नागरिक कॅरम क्‍लबतर्फे संपूर्ण वर्षभर ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध क्रीडास्पर्धा, तसेच अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत असतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)