ज्येष्ठांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे

नागपूर – ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.

विधानसभेत 10 जुलै रोजी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात राजकुमार बडोले यांनी यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वैद्यकिय महाविद्यालयांशी संबंधित रूग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी 5 टक्के खाटांची सोय ठेवण्यात आली असून शासकिय रूग्णालयात त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहे.

खासगी वैद्यकिय संस्था, रूग्णालये, ट्रस्टांनी ज्येष्ठ रूग्णांना 50 टक्के सवलत देण्याचे तसेच खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांनी ज्येष्ठांना फी मध्ये सवलत द्यावी, असे निर्देश दिले असल्याचेही बडोले यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणाऱ्या छळाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्प लाईन सुरू करून आणिबाणीच्या वेळी त्यांना तात्काळ आरोग्य सेवा आणि सुरक्षेची मदत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी, तसेच मोबाईल अलार्म, इंटरनेट, जीपीएस सारखी आपत्कालीन सतर्क यंत्रणा उभारण्याबाबत आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची अद्यायावत यादी तयार करून पोलीस प्रतिनिधीने सामाजिक कार्यकर्त्यांसोबत महिन्यातून एकदा त्यांची भेट घ्यावी, तसेच पालकांचा सांभाळ न करणाऱ्या डिफॉल्टर पाल्यांची यादी तयार करून त्याला व्यापक प्रसिध्दी देण्याच्या सूचनाही गृह विभागाला करण्यात आल्याचे बडोले म्हणाले.

वैशिष्ट्‌ये…
– आयकर, प्रवास व इतर बाबतीत मिळणाऱ्या सवलतीप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिकेच्या करातही ज्येष्ठांना सवलत.
– निवासी व अनिवासी संकुलात वृध्दाश्रमासाठी अतिरिक्त एफएसआय.
– प्रत्येक जिल्ह्यात 4 वृध्दाश्रमासाठी जागा राखीव.
– नगर विकास विभागाने नवीन टाऊनशीप अथवा मोठ्या संकुलास परवानगी देतांना त्यांना वृध्दाश्रम स्थापण्याची सक्ती करणे, तेथे ज्येष्ठ ग्राहकांना तळ मजल्यावर घर अथवा गाळे द्यावेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)