ज्युव्हेंटस 11 गुणांच्या आघाडीसह अव्वल स्थानी

मिलान: फ्लोरेन्टिना संघाला 3-0 असे हरवत ज्युव्हेंटस संघाने आपली अपराजित मालिका कायम ठेवली असून या विजयासह त्यांनी सिरीज ए (इटालीयन लीग)मधील आपले अव्वल स्थान 11 गुणांच्या फरकाने कायम ठेवले आहे.
या सामन्यातील पहिला होण्यासाठी 30 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.

31व्या मिनिटाला रॉड्रिगो बेंटाकूर याने गोल केला तर त्यानंतर 69 व्या मिनिटाला ज्युव्हेंटसचा कर्णधार जॉर्जिओ चिएलिनीने 69 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला होता. ख्रिस्टियानो रोनाल्डो याने ज्युव्हेंटससाठी 79व्या मिनिटाला पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करत ज्युव्हेंटसाठी तिसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

-Ads-

ज्युव्हेंटस संघाच्या नावावर 14 सामन्यात 40 गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नापोली संघाकडे रविवार पर्यंत अटलांटा संघाविरुद्धचा सामना खेळण्याच्या अगोदर 29 गुण आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)