ज्युबिलंट कंपनीतील बाधितांची संख्या वाढली

नीरा येथील घटना: ऍसीटिक अनहायड्रॉईड रसायन गळतीचा धोका अजून टळला नाही

नीरा- नीरा येथील ज्युबिलंट कंपनीतील वायू गळतीनंतर जखमी झालेल्या कामगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज, अखेर 48 कामगार वायू गळतीने बाधित झाले आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन बाधितांची चौकशी केली. आज, सकाळी कामगार संघटनेचे नेते यंशवंत भोसले यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

लोकांना डोळ्यात व फुफुसात मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत. यामध्ये चार कामगार अत्यवस्थ आहेत. दरम्यान, या अपघाताला यशवंत भोसले यांनी कपनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. विना प्रशिक्षित व कंत्राटी कामगार कंपनीत भरल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, आज दिवसभरातही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीचे उपाध्यक्ष सतीश भट यांच्याशी याबाबत वचारणा केली असता. आपणाला याबाबत काही माहिती नसल्याचे व याबाबत वरिष्ठच आपल्याशी बोलतील असे त्यांनी सांगितले.

 • कंपनीतील स्थिती नियंत्रणात मात्र धोका टळला नाही…
  कंपनी प्रशासन माहिती देत नसल्यामुळे रसायन नष्ट करण्यास आलेल्या इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि हेल्थच्या संचालकांकडे याबाबत विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी माहिती दिली की, ऍसीटिक अनहायड्रॉईड विषारी पदार्थ आहे. याच्या संपर्कात आल्यावर डोळे व फुफुसाला त्रास होतो. सध्या, कंपनीतील परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका अजूनही टळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, त्याच बरोबर कंपनी प्रशासनाच्या चुकांमुळेच हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे निरा, निंबूत, पाडेगाव परिसरातील लोकांचे जीवन असुरक्षित झाले आहे.
 • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या सूचनांची पायमल्ली…
  कंपनी मध्ये काम करताना धोकादायक उत्पादन विभागात निमयोजने अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना किंवा कंत्राटी कामगारांना कामावर ठेऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. कंपनीने दि. 1/1/2019 व दि. 8/1/2019 रोजी दिलेल्या भेटीमध्ये अशा प्रकारे कामगार काम करीत आढळून आल्याचे आदेशात म्हंटले आहे. मात्र, तरीही या आदेशाचे उंल्लघन होत असल्याचे कालच्या अपघातातून स्पष्ट झाले आहे.
 • कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…
  या निष्काळजीपणा बद्दल कंपनी प्रशासना विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे. त्याच बरोबर वारकरी शेतकरी संघटनेच्यावतीनेही जेजुरी पोलिसात संबंधित अधिकारी सतीश भट व दीपक सोनटक्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 • कंपनीतील घटनेतील जखमींची नावे…
  अमीर सय्यद, राम भगवान साकाटे, शंकर जयचंद्र, दिलीप वाघमारे, सौरभ बनकर, यशवंत भगत, माऊली ताटे, माधव पाचषाहेर, दत्तात्रय गायकवाड, अमोल गायकवाड, चेतन जाधव, अविनाश पवार, शेखर जाधव, लखन गायकवाड, प्रकाश पवार, अविनाश सूर्यवंशी, हनुमंत पाटोळे, शाम नाईक, अक्षय राजे, रमेश काकडे, नाना यादव, अखिलेश कुमार, संजय ढवळे, प्रमोद भापकर, मल्हारी दुर्वे, मयूर कदम, केशव सहानी, संजय कदम, लक्ष्मण तोडकर, विनोद चौघुले, सुनील दुर्वे, निलेश कापरे, सोमनाथ खांडेकर, कृष्णकांत, विनोद पाटील, संगीत पवार, पी. धर्मराज, महेश धोंगरे, जाकीर शेख, संगीता पवार, संकेत जेधे, श्रीनाथ धुमाळ, आरिफ मुजावर, दयाशंकर यादव, मिलिंद मोहिते, जितेंद्र देसाई, अक्षय शिंदे, अमित अडगळेकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)