ज्युनिअर हॉकी विश्वचषक दर दोन वर्षांनी

भुवनेश्वर: कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने ज्युनिअर हॉकी विश्वचषक दर दोन वर्षांनी होणार याची घोषणा केली आहे. परंतु, पुढील विश्वचषक कधी होणार आणि त्याचे यजमानपद कोण भूषविणार हे सांगण्यात त्यांनी असमर्थता दर्शविली आहे.

शेवटचा ज्युनिअर हॉकी विश्वचषक 2016 मध्ये लखनौ येथे झाला होता आणि तो जिंकण्यात भारतीय संघाला यश आले होते. शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन सचिव थिएरी वेल यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षीपासून दर दोन वर्षंनी ज्युनिअर विश्वचषक घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वांनी साथ देणे अपेक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक पिढीला ज्युनिअर विश्वचषकात सहभागी होता येईल आणि आपला खेळ दाखवता येईल. पुढील ज्युनिअर विश्वचषक हा कदाचित 2021 मध्ये होऊ शकतो पण याचा अजून निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)