ज्याला कधी तुरुंगात डांबले, त्याच राजाभैयाच्या मताची मायावतींना गरज

लखनौ – उत्तर प्रदेशातील अनिश्‍चित राजकारणातील एका अतर्क्‍य वळणावर बहुजन समाजाच्या मायावतींना उत्तर प्रदेशातील एकमेव राज्यसभा जागेसाठी राजाभय्याच्या मतावर विसंबून राहावे लागल्याचे चित्र दिसत आहे. याच राजाभैयाला 16 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री मायावती यांनी दहशतवाद विरोधी कायद्याखाली तुरुंगात डांबले होते.

कधीकाळी मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोघांशीही जवळीक असलेल्या राजाभैया म्हणजेच रघुराज प्रताप सिंह यांच्याकडे आज हुकुमाचा एक्का असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

आमचे मत समाजवादी पक्षाला, अखिलेश यादव यांना आहे,. मायावतींना आमचा जुनाच विरोध आहे, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष आपले मतभेद दूर ठेवून एकत्र आल्याची आपल्याला पर्वा नाही. असे राजा भैयाने राज्यसभेसाठी आपले मत देण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना उघडपणे म्ह्टले आहे.
अखिलेशने ट्विट करून त्याचे आभार मानले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)