ज्याच्या घरात आई, वडील तोच खरा श्रीमंत – तांबे महाराज

कुकाणे – “”माता-पित्याने सांगितलेले काम जो निमुटपणे करतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. ज्याच्या घरात आई-वडील असतात तोच खरा श्रीमंत. सात्विक आई-वडिलांनी घर सोडले तर त्या घराला उतरती कळा लागल्याशिवाय राहत नाही,” असे प्रतिपादन रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केले.
नेवासे तालुक्‍यातील अंतरवाली येथे अधिकमासानिमित्त ज्ञानेश्वर बचतगट, ओमसाई बचतगट व गुरुदत्त बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व शिवाजी महाराज देशमुख, सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रामकथेत तिसऱ्या दिवशीच्या सेवेप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वेशभूषा केलेले ब्रम्हदेव, प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, वसिष्ठमुनी व लंकाधीश रावण यांनी वठवलेल्या भूमिकांनी श्रोत्यांचे लक्ष वेधले.
या वेळी श्रीराम-सीता लग्नसोहळ्यात अनेकांनी रोख आहेर देऊन दाद दिली. कार्यक्रमासाठी सुनीलगिरी महाराज, गोपालनंदगिरी महाराज, कृष्णा महाराज उगले, माजी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पत्रकार सुनील पंडित, माजी से. सो. अध्यक्ष उत्तमराव वाबळे, सरपंच द्वारकाताई सरोदे आदी हजर होते. बचत ठेव योजनेचे अध्यक्ष प्रा. भारत वाबळे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
सुनीलगिरी महाराज म्हणाले, की घरात आई आणि अंगणात एक तरी गायी असावी. या वेळी लंघे म्हणाले, की बचत गटांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. उपाध्यक्ष दीपक वाबळे यांनी आभार मानले. सोहळ्याची सांगता सोमवारी (दि. 21) सकाळी 8 वा. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)