ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने महामार्ग दुमदुमला

कार्तिकीसाठी दिंड्यांचा आळंदीकडे ओघ

राजगुरूनगर-आळंदी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 3) होणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्ताने माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या राज्यभरातील वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्ग हजारो वारकऱ्यांच्या मुखातून निघणाऱ्या ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमला आहे.
आळंदी येथे कार्तिकी एकादशीला देशभरातून लाखो वारकरी दरवर्षी येतात. हे वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून पायी प्रवास करतात. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या आज खेड तालुक्‍यात दाखल झाल्या आहेत. या दिंड्यांचे तालुक्‍यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातल्या नाशिक, नगर, ठाणे आदी जिल्ह्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या पुणे-नाशिक महामार्गावरून आळंदीकडे येत असतात. वारकरी आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने शेकडो किलोमीटर पायी चालत येतात. राजगुरूनगर, चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्ग आज वारकऱ्यांच्या दिंड्यानी फुलाला आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाची ओढ या भक्तांना लागली असल्याने त्यांची पावले आळंदीच्या दिशेने झपाझप पडत आहेत. राज्यभरातून आलेल्या या दिंड्या आज राजगुरूनगर, चाकण परिसरात मुक्कामी आहेत. स्थानिक दानशुरांकडून या दिंड्यामधील वारकऱ्यांना जेवण, नाष्टा, आरोग्य तपासणी, झोपण्यासाठी व अंघोळीसाठी आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
रविवारी राज्यभरातून आलेल्या दिंड्या आळंदीमध्ये समाविष्ट होतील. आळंदीमध्ये कार्तिकी एकादशीला हा मोठा सोहळा पार पडतो. भजन कीर्तनातून माउलींचा जयघोष करीत पंधरा दिवस ते तीन आठवडे पायी चालत वारकरी हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होतात. प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंसाठी मोठी तयारी केली आहे. यात्राकाळात संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून डॉक्‍टरांचे पथक, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)