ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पोखरी दुमदुमली

पारनेर, दि. 20 (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील पोखरी येथील श्री क्षेत्र पोखरी ते श्री क्षेञ पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन श्री रंगदास स्वामी भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ पोखरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या 17 वर्षापासून हा पायी दिंडी सोहळा निरंतर सुरू आहे. या श्री संत रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार दि 19 जुन रोजी प्रस्थान झाले असून सोहळा मंगळवारी सकाळी 10 वा पोखरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

या दिंडी सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री रंगदास स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने करण्यात आले आहे. हा दिंडी सोहळा अहमदनगर, श्रीगोंदा , सोलापूर आदि जिल्ह्यातून पायी प्रवास करत पंढरपूरकडे जाणार आहे. श्री क्षेत्र पोखरी येथुन ज्ञानोबा तुकाबाच्या जय घोषात मार्गक्रमण करून सोहळा वाफारेवाडी, वडगाव दर्या, पारनेर, हंगे, पारनेर, सुरेगाव, श्रीगोंदा, देऊळगाव, श्रीगोंदा, कोकणगाव, श्रीगोंदा, पिंपळवाडी, राशीन, राऊ काळे वस्ती, राशीन, कोकरे वस्ती, उमरड,पांगेरे, नाळेवस्ती, टेंभुर्णी, सुगाव मार्गे पंढरपूर येथे 2 जुलै रोजी दाखल होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)