ज्ञानोबा घोणे यांना पुरस्कार जाहीर

टाकवे बुद्रुक – फुले, शाह, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने या वर्षीचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव’ पुरस्कार पुणे व सातारा जिल्हा ह्री श्रमिक संघाचे सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांना जाहीर झाल्याची माहिती मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांनी दिली. फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे चौथे साहित्य संमेलन भोर येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी आहेत. त्यांच्या हस्ते घोणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. घोणे गेल्या 50 वर्षांपासून कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी, कष्टकरी व धरणग्रस्तांसाठी काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. त्यांना यापूर्वी सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने एस. एम. जोशी पुरस्कारही मिळाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)