संग्रहित फोटो

आळंदी- यशाच्या उंच शिखरावर जाण्यासाठी, ध्येयवादी बनवण्यासाठी केवळ उपक्रमच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाची चळवळ श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय आळंदी देवाची येथे “शिकूया आनंदे- दप्तराविना शाळा’ हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणारा हा उपक्रम प्रशालेचे पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहे. विषय समितीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मजेत शिकूया व्याकरण, खेळूया शब्दांशी, हसत-खेळत सोडवा गणिते, जाणुया फुलांचे विश्‍व, ओळख पृथ्वीच्या अंतरंगाची, भाषिक खेळ आदी उपक्रम इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये बुद्धीमता, स्मरणशक्‍ती, कला-क्रीडा नेतृत्व, नवनिर्मिती या क्षमतांचा विकास होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मुंगसे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)