ज्ञानेश्‍वरी सोहळ्यास असंख्य भाविकांची हजेरी

कराड – गुरुवर्य भगवानमामा कराडकर यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त मारुती बुवा कराडकर मठात ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या भक्तीभावाने सुरवात झाली असून वारकऱ्यांसह भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी लागत असल्याने संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हावून गेला आहे.

गुरुवर्य मठाधिपती ह. भ. प. बाजीरावमामा कराडकर यांच्या हस्ते पारायण सोहळ्याचे उद्‌घाटन झाले. सप्ताह काळात ह. भ. प. सिद्धनाथ महाराज शामगावकर, ह. भ. प. भागवताचार्य श्रीकांत महाराज पुणे यांची किर्तन सेवा झाली.किर्तनसेवेतून वारकरी सांप्रदायामध्ये सेवेला मोठे महत्व आहे. भाविकांनी निष्काम सेवा करावी, असा संदेश देण्यात आला. पहाटे काकड आरती, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्‍वरीचे वाचन, दुपारी तीन ते चार या वेळेत महिला मंडळाचे भजन, चार ते पाच या वेळेत हरिपाठ, पाच ते सहा या वेळेत प्रवचन असे दैनंदिन कार्यक्रम सुरु आहेत. किर्तन सेवेनंतर अन्नदान केले जाते. या अन्नदानाचा दीड हजारहून अधिक भाविक लाभ घेत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ह. भ. प. गुरुवर्य हरिप्रसाद महाराज देहूकर यांचे काल्याचे किर्तन रविवार, दि. 16 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे. या भव्य सोहळ्यात वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हरिनाम सप्ताह काळात सुरु असलेल्या कीर्तनसेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन बाजीरावमामा यांनी केले आहे.

============================


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)