ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर प्रदीपन

भेंडे – येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन 2018-19 या 45 व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन उद्या शुक्रवार (दि.12) रोजी सकाळी 10 वाजता कारखान्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांचे हस्ते होणार आहे.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष मा.आ. पांडुरंग अभंग, ऍड. देसाई देशमुख, संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)