ज्ञानसागरच्या भावना रावत हिची ज्युदो स्पर्धेसाठी निवड

जळोची- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत बारामती तालुक्‍यातील ज्ञानसागर गुरुकुलच्या भावना रावत या विद्यार्थिनीने 44 किलो वजनी गटात पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आणि 50 किलो वजनी गटात श्रेयश शिंगाडे या विद्यार्थ्यानेही पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी श्रुतिका कांबळे, साक्षी काळे, शिवम शिनगारे, चैतन्य तांबे, सुरज खाडे, आदित्य उगलमोगले, प्रतीक काळे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ कामगिरी बजावली. भावना रावत या विद्यार्थिनीची निवड जिल्हा आणि आता पुणे विभागासाठी करण्यात आली आहे. ही स्पर्धा 3 आणि 4 ऑक्‍टोबर दरम्यान खडकवासला येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या विद्यार्थिनीची निवड पुणे विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी झाली असून ही स्पर्धा 8 ऑक्‍टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, अहमदनगर येथे होणार आहे. क्रीडाशिक्षक सागर लाड आणि भावना रावत या दोघांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्ष रेशमा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, उपसचिव आलका आटोळे पल्लवी सांगळे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)