ज्ञानसंपदा स्कुलला विविध क्रीडा प्रकारात पारितोषिके

नगर – येथील सावेडीतील भिस्तबाग परिसरात असलेल्या ज्ञानसंपदा स्कुलला शैक्षणिक वर्ष सन 2017-18च्या विविध क्रीडा प्रकारात विभागीय व राज्यस्तरीय 18 पारितोषिके मिळाली आहेत अशी माहिती प्राचार्या शिवांजली अकोलकर यांनी दिली
हॅण्डबॉल , बास्केटबॉल , नेटबॉल या अंतर शालेय स्तरावर झालेल्या खेळात प्रथम क्रमांक मिळवुन विभागीय स्तरावर संघाची निवड झाली होती वैयक्तिक क्रीडा प्रकारात योगा व रोप मल्लखांब मध्ये गौरी गौड , गोळाफेक , थाळीफेक ,भालाफेक या मैदानी स्पर्धेत जुबेर सय्यद याने द्वितीय येऊन विभागीय पातळीवर निवड झाली होती
बॉक्‍सिंग , किक बॉक्‍सिंग , तायकोंडो क्रीडा प्रकारात वीर गोंगे , पुष्कर बडवे यांची जिल्हापातळीवर निवड झाली होती तर हॅण्डबॉल मध्ये दीपक चौधरी , जुबेर सय्यद , सुरज तरटे , शशिकेश पाल व शिवम सप्रे यांची राज्य संघात निवड होऊन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होता
फुटबॉल मध्ये यश बुट्टे , आर्यन डोके , प्राजक्ता ठुबे , जागृती बोरुडे यांची डब्ल्यु आय एफ सी च्या राज्य संघात निवड होऊन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होता , बॅडमिंटन मध्ये सई काळे हिची राज्य संघात निवड होऊन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग होता
रोटरी क्‍लबच्या फुटबॉल स्पर्धेत मुलीच्या संघाला प्रथम क्रमांक मिळाला तसेच बेस्ट स्टायकार दीक्षा परदेशी व बेस्ट हाटफ साक्षी जाधव याना पदके मिळाली , नाशिक विभागीय स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक अनेकांनी सहभाग होता शालेय व जिल्हास्तरीय स्पर्धेत अनेक प्रकारात शाळेचा संघ प्रथम आला क्रीडा शिक्षक वृषाली पटेकर व गणेश धोटे तसेचसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज , अशोक भगत , अरुण कुलकर्णी , कारभारी भिंगारे , अविनाश बोपर्डीकर आदींचे मार्गदर्शन होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)