“ज्ञानश्री’च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग झेप

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) – रावसाहेब वांगडे मास्तर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सज्जनगड रोड वरील ज्ञानश्री इन्स्टिटयूटच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करून उत्तुंग यश संपादन केले आहे.
समाजातील विविध स्तरांमधून या यशाबद्दल ज्ञानश्री इंस्टीट्युटने व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्धल कौतुक होत आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष – मधील परीक्षांमध्ये ज्ञानश्री इंस्टीट्युटमधील सात अभियांत्रिकी विध्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील शुभम भोसले, निरंजन जाधव व प्रदीप शेडगे यांनी अनुक्रमे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, पाचवा व नववा क्रमांक पटकावलेला आहे. तसेच कॉम्पुटर सायन्स ऍन्ड इंजिनीरिंग या विभागातील वर्षा कदम हिने सातवा तर काजल गोळे हिने अथवा क्रमांक पटकाविला आहे. इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍन्ड टेलीकॉम्युनिकेशन विभागातील ज्योती शेंडगे हिने व्दितीय तर गौरी कुलकर्णी हिने नववा क्रमांक मिळवला आहे.
खरेखुरे इंजिनीरिंग शिक्षणामध्ये अभ्यासाबरोबरच तांत्रिक कौशल्य विकसित होण्यासाठी ज्ञानश्री इन्स्टिटयूट पहिल्यापासून प्रोजेक्‍ट बेस्ड लर्निंग योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करत असते याचीच परिणीती म्हणजे देशपातळीवरील “प्रोजेक्‍ट स्पर्धेमध्ये ” विध्यार्थ्यानी पारितोषिके मिळविलेली आहेत. प्रथम ते तृतीय क्रमांकाची विशेष प्राविण्य पारितोषिके मिळविलेली आहेत. तसेच भारतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या प्रोजेक्‍ट स्पर्धांमधील, देशविदेशातील जॉनडिर, महिंद्रा राइज अश्‍या नामवंत कंपन्यांनी एस. ए. इ. चॅप्टरच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शेती उद्योगासाठी पूरक असे ‘स्वयंचलित कांदा काढणी’ यंत्रासाठी देशपातळीवरील “तिफण’ स्पर्धेमध्ये ज्ञानश्रीच्या खिल्लार टीममध्ये सहभाग असणाऱ्या प्रज्योत गोडसे, अनुराग मतकर, आकाश येवले, सागर चव्हाण, राहुल भोसले, हर्षल जाधव, अनिकेत माने, ओंकार शितोळे, वैभव जाधव, सौरभ जाधव यांनी प्रा. राहुल साळुंखे यांनी केलेले मार्गदर्शन व या सर्वांचे अथक परिश्रम यामुळे “सेकंड रनर अप’ (व्दितीय स्थान) तसेच बेस्ट फ्युएल इकॉनॉमिमध्ये प्रथम क्रमांक मिळवून ज्ञानश्रीच्या यशामध्ये मानाचा शिरपेच रोवलेला आहे. एम. आय. टी., ए. डी. टी., पुणे यांच्यामार्फत लोणी काळभोर येथे घेतलेल्या देशपातळीवरील प्रोजेक्‍ट स्पर्धेमध्ये ज्ञानश्रीमधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागाच्या कु. सोनाली जाधव, कु. पल्लवी जांभळे, कु. ताहीर मोलकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून ज्ञानश्रीचे हे यश व्दिगुणीत केलेले आहे. एम. आय. टी., ए. डी. टी., पुणे यांच्यामार्फत लोणी काळभोर येथे घेतलेल्या देशपातळीवरील प्रोजेक्‍ट स्पर्धेमध्ये ज्ञानश्रीमधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागाच्या कु. सोनाली जाधव, कु. पल्लवी जांभळे, कु. ताहीर मोलकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून ज्ञानश्रीचे हे यश व्दिगुणीत केलेले आहे.
या सततच्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. भाई वांगडे, ट्रस्टी श्री. चंद्रकांत वांगडे, सचिव श्री. ज्ञानदेव रांजणे, कार्यकारी संचालक श्री. रोहित वांगडे, सी. इ. ओ. सौ धन्वंतरी वांगडे, प्राचार्य डॉ. अजय जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग, स्टाफ तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. ज्ञानश्रीची ही प्रगती आदरणीय भाईंच्या विद्यार्थ्यांसाठी खरेखुरे इंजिनीरिंग शिक्षण देण्याच्या तळमळीतून साध्य झालेले आहे. सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी ज्ञानश्रीच्या प्रगतीस साथ देऊन व त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा कार्यकारी संचालक रोहित वांगडे यांनी व्यक्त केलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)