ज्ञानयुक्त परिवर्तनाने बदल घडवूया… 

भारतभूमीवर परकीय आक्रमणे होऊन परकीय राजसत्ता स्थापित झाल्या. घुसखोरी, यादवी, लढाया, नैसर्गिक संकटे या सर्वांना सामोरे जाऊन आज देश भारतीय संस्कृती जपून आहे. भारताने अद्याप कोणत्याही शेजारील देशावर स्वत:हून आक्रमण केले नाही. जगातील व्यापारी, राजे, सैन्य व ब्रिटीश राजसत्ता यांनी भारतीय संपत्तीची प्रचंड लूट केली. तरी आजही आपल्या देशाचा धनसंपदेत जगात सातवा क्रमांक लागतो. 

भारतीयांची मानसिकता व कृतीचे आंदोलने, निदर्शने, मोर्चे व सत्याग्रह यातून होणारे प्रदर्शन देशाला अधोगतीकडे ढकलत आहे. यामुळे ‘रोजच मरे त्याला कोण रडे’ ही परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या आडून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार देशभर होतात. रस्ते अडवून वाहतुकीचा खोळंबा होतो, सर्वच नागरिक वेठीस धरले जातात. आपण आपल्याच राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करतोय याचे भान कोणी ठेवत नाही. येथून पुढे यासाठी सरकारने जिल्हा व तालुक्‍याच्या ठिकाणी एक वेगळे मैदान निर्माण करावे. तेथेच अशा कार्यक्रमांचे
आयोजन करावे. वाहतुकीच्या व इतर सार्वजनिक ठिकाणी अशी आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह करण्यास बंदी घालून कडक कायदे अवलंबावेत. एवढेच काय तर सभा, धार्मिक उत्सव रस्त्यावर करण्यावर पायबंद घालावा. यामुळे जनतेला त्रास होणार नाही.

स्वातंत्र्याच्या काळात हिंसक आंदोलने आवश्‍यक होती. कारण की ब्रिटीशांना दहशत पोहचवणे त्याकाळी गरजेचे होते. पण आज सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात अशी आंदोलने मानवी हक्काचा गळा घोटत आहेत. एकाला मनमानी जगताना दुसऱ्यास त्रास पोहचणे हे कितपत योग्य वाटते? भारतभूमीवर परकीय आक्रमणे होऊन परकीय राजसत्ता स्थापित झाल्या. घुसखोरी, यादवी, लढाया, नैसर्गिक संकटे या सर्वांना सामोरे जाऊन आज देश भारतीय संस्कृती जपून आहे. भारताने अद्याप कोणत्याही शेजारील देशावर स्वत:हून आक्रमण केले नाही. जगातील व्यापारी, राजे, सैन्य व ब्रिटीश राजसत्ता यांनी भारतीय संपत्तीची प्रचंड लूट केली. तरी आजही आपल्या देशाचा धनसंपदेत जगात सातवा क्रमांक लागतो.

देशाची प्रगती होत असताना जुन्या संकल्पना सोडून देश विकासासाठी ज्ञानाधिष्ठित समाज परिवर्तनाची गरज आहे. औद्योगिकीकरणाबरोबर सेवा उद्योगाची व्याप्ती जगभर पसरली. अमेरिका, चीन यासारख्या देशांनी सेवा व विक्री उद्योगात जगभर साखळी विस्तारीत करुन आपआपल्या अर्थव्यवस्था मजबूत केल्या. दुसऱ्या देशाकडून माल बनवून घेऊन कमी मनुष्यबळात विक्री साखळी राबवून आपली कमाई करुन घेतली.

युरोपातील दौऱ्यामध्ये हॉटेलवर उतरल्यावर खोलीमध्ये चहा घेण्यासाठी स्वागत कक्षात मी फोन केला आणि उत्तर मिळाले, ‘चहाचे साहित्य खोलीमध्ये ठेवले आहे. आपण स्वत: बनवून घेऊ शकता. नाहीतर खालील उपहारगृहामध्ये चहा मिळेल’. माझ्या लक्षात आले की तेथे खोलीमध्ये चहा, जेवण, साबण आपणास स्वागतकक्षातून घ्यावे लागतात. उपहारगृहामध्ये सुध्दा फक्त दोन ते तीन माणसे सेवेसाठी हजर असतात. स्वत: जेवण घेणे, नंतर खरकटे बाजूला काढून जेवणाची ताटे एकत्र ठेवणे अशी कामे स्वत: करावी लागतात. डामडौल, मोठेपणा यांचे प्रदर्शन तेथील ग्राहक करीत नाही. आपल्याकडे जेवणाच्या एका टेबलभोवती कामगारांचा घोळका सेवेत ठेवणे म्हणजेच मोठेपणाचे लक्षण मानले जाते. या वृत्तीमुळे देशाचे मनुष्यबळ आवश्‍यकतेपेक्षा निष्क्रिय राहते. विदेशात कमी मनुष्यबळात काम करुन घेण्याची हातोटी आहे. ब्रिटीशांनी आपणात रुजवलेली ‘सायबी’ बडेजावाची वृत्ती आपण जोपासत गेलो आणि ब्रिटीश बदलत गेले. यातून मला बोध झाला की, भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची असून आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्धी आहेच. पण व्यवस्थेअभावी बेरोजगारी वाढली आहे.

एकीकडे आपल्या कृषीप्रधान देशात कृषीयोग्य जमीन क्षेत्र अमेरिकेनंतर आपल्याकडेच आहे. कृषी उत्पादनाचे पडणारे भाव व विक्री, तसेच प्रक्रियेच्या अभावामुळे अर्ध्या उत्पादनाची नासाडी होते. जगाप्रमाणे आपल्याकडे सामाजिक व व्यवहारीक बदल करणारी ज्ञानाधिष्ठ समाजाची निर्मिती हवी आहे. प्राचीन काळापासून ज्ञान व संस्कृती याचा ठेवा आपण जपत आलो. पण जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये संशोधन व ज्ञान याची जोपासना करण्यात भारतीय कमी पडले. देशातील सॉफ्टवेअर उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी करत असून यालाच जोड संगणकीय व इतर क्षेत्रातील अभियंत्यांची मिळत आहे. सत्ता आणि संपत्तीपेक्षाही ज्ञानातून मिळणारे अर्थार्जनाचे मूल्य कधीही श्रेष्ठ! आगामी संशोधनातून वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या रेल्वे, विमाने, वाहने यास तंत्रज्ञानाद्वारे चालवले जाऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवकाश दळणवळणाचा वापर वाढलेला असेल. देशादेशात कलह होऊन ‘सायबर वॉर’ वाढत चालले.

मग हवी आहे परिपूर्ण ज्ञान संपादन करण्यासाठी येथील शैक्षणिक व्यवस्थेची निर्मिती. देशाच्या सामर्थ्याच्या व प्रगतीच्या वेगवेगळ्या कक्षा राहतील, देशविकास केवळ ज्ञानाधिष्ठ अर्थकारणावरच टिकून राहील. देशात सर्व पोषक वातावरण असताना विकास नीतीमध्ये फक्त देखावा केला जातो. अंमलबजावणी प्रत्येकापासून सुरु होणे क्रमपात्र आहे. सामुदायिक इच्छाशक्तीनुसार प्रबळ राष्ट्र उभारणीचे काम आपणास करावे लागेल. एकमेकास अडथळे आणण्याच्या समाज व्यवस्थेमुळे आज प्रांतवाद, जातीवाद, अंधश्रध्दा, वर्गवाद, अशा अनिष्ठ रुढींच्या कक्षेत प्रत्येक भारतीय बांधला गेला आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे की, ‘विचार करण्याची प्रक्रिया म्हणजे विकास. विचार न करणे म्हणजे एखादी व्यक्ती, संस्था आणि देशासाठी एक प्रकारचे साचलेपण. विचारातून कृतीचा जन्म होतो. कृतीहीन ज्ञान व्यर्थ आणि कालबाह्य आहे. ज्ञानावर आधारित कृती संकटाचे रुपांतर समृध्दीत करत असते.’ त्यासाठी सर्वांनी देशसेवेचे व्रत घेऊन धोरणे व योजना यशस्वी करण्यासाठी ज्ञानयुक्त परिवर्तनाने बदल घडवावा. कृतीहीन ज्ञान व्यर्थ आहे, पण त्यावर आधारीत विचार करुन संकटाचे रुपांतर समृध्दीत करता येते, असे वरील वाक्‍यातून सूचित होते. या त्यागभूमीत अनेकांनी बलिदाने दिली. त्यामुळे त्यांच्या आदर्श देशप्रेमाची स्वप्नपूर्ती करुया!

– डी. एस. काटे

(उद्योजक अभियंता व अर्थविषयक अभ्यासक)

dsconstructionab@gmail.com
cees.veb. 8806060000/9422201140
http://www.facebook.com/dskatearticles


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)