ज्ञानकर्मीचा सेवापूर्ती सेवा गौरव

ओतूर- येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालय ओतूर (ता. जुन्नर) चे मुख्याध्यापक दिनकर यशवंत दराडे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर होते. ते आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, शिक्षण ही काळाची गरज आहे, हे ओळखून दराडे यांनी अतिशय दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले आहे. इंग्रजी विषयाचे सखोल अध्यापन केले. निवृत्ती नंतरही ते असेच मार्गदर्शन करतील. 34 वर्षांच्या सेवेत त्यांनी इंग्रजी अध्यापनाचे काम केले. इंग्रजी विषयाचा 10 वीचा निकाल 100 टक्के लावल्याबद्दल ग्राम विकास मंडळाने प्रमाणपत्र देऊन वेळोवेळी त्यांना सन्मानित केले. पंचायत समित, जुन्नर यांच्या वतीने गुणवंत शिक्षक, शिवनेर प्रातिष्ठान एरोली यांच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, विश्वासराव डुंबरे, गणेश कवडे, मोहित, ढमाले, रंगनाथ घोलप, शरद चौधरी, वर्षा तांबे, बबनराव कुलवडे, प्रमिला शिंदे, गंगाराम डुंबरे,रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे ,महेंद्र पानसरे , ,सचिव प्रदीप गाढवे ,पंकज घोलप धनंजय डुंबरे, ऋषिकेश डुंबरे, मिलिंद खेत्री, अनेक शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. भाऊसाहेब खाडे व शरद माळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिक अकोलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर ब्रह्मदेव घोडके यांनी आभार मानले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)