जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी विजय

जोहान्सबर्ग : विराट कोहलीच्या भारतीय संघाने जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर 63 धावांनी विजय मिळवला आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना डिन एल्गर आणि हाशिम अमलानं दक्षिण आफ्रिकेला एक बाद 124 धावांची दमदार मजल मारून दिली होती. त्याच धावसंख्येवर ईशांत शर्माने अमलाचा ला बाद केले आणि मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची फळी कापून काढली.

शमीने  28 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमारने  प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने जोहान्सबर्ग कसोटी जिंकल्यामुळे, दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा विजयावर समाधान मानावे  लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)