जोहरी यांच्याविरोधात कारवाई करा; न्यायालयाचे ‘जेएनयूला’ आदेश

नवी दिल्ली : लैंगिक शेरेबाजी आणि  छळवणूक झाल्याप्रकरणी ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’च्या नऊ विद्यार्थिनींनी प्रा.अतुल कुमार जोहरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार दाखल करूनही त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने जेएनयूला फटकारले आहे .

पोलिसात तक्रार दाखल करूनही ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’ने  जोहरी यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केला आहे . तसेच या विद्यार्थिनींचे पत्र हीच तक्रार मानून कारवाई सुरू करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला. विद्यार्थिनींना सुरक्षितपणे अध्ययन करता यावे यासाठी विद्यापीठाच्या आवारात प्रा. जोहरी यांना प्रवेश करू देऊ नये, असंही न्यायालयाने यावेळी म्हंटल.

-Ads-

दरम्यान विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीबाबत मी कठोर पावले उचलल्यानेच हे आरोप झाले आहेत, असा दावा प्रा. जोहरी यांनी केलाय. मी ज्यांना ज्यांना कठोर कारवाईचे मेल पाठवले होते त्यात या विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे त्यांनीच या खोटय़ा तक्रारी दाखल केल्या आहेत. ज्या कथित शेरेबाजीचे आरोप होत आहेत ती शेरेबाजी २०१३-१४ मध्ये झाल्याचे तक्रारदारच म्हणतात. मग तक्रार दाखल करायला २०१८ का उजाडले, असं जोहरी यांनी म्हंटलं आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)