जोशीविहिर येथील रस्त्याची दुरवस्था

जोशीविहीर : संततधार पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे.

ओझर्डे, दि. 30 (वातार्हर) – जोशीविहिर परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार पावसामुळे त्यात आणखीच भर पडत आहे. त्यातच लाडक्‍या बाप्पाचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे साहजिक बाप्पाचे आगमन हे खड्डेमय रस्त्याने होणार असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर जवळ जवळ एक ते दोन किलोमीटरवर रस्त्यात एक ते दीड फुटाचे खड्डे पाहायला मिळत आहेत. त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोशीविहिर मधील ग्रामस्थ आणि गणेश मंडळाकडून होत आहे. त्या रस्त्यावर अपघात पण वारंवार होताना दिसून येत आहेत. गाडी चालक खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होताना वारंवार आढळून येत आहे. गेल्या तीन महिन्या पाठीमागे खड्ड्यात मुरूम टाकला होता. पण पावसामुळे व अवजड वाहनांमुळे त्या रस्त्याची दुरवस्था अत्यंत वाईट झाली आहे. परंतु अजून 3 ते 4 चार महिन्यांनी ऊस वाहतूक सुरू झाल्यावर रस्त्याची अवस्था काय होणार याबाबत उलट चर्चा सूरु होत आहे. रस्त्याच्या कामांची चौकशी सुरू झाली असून कारवाई होऊन नव्याने रस्त्या करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)