जोतिबा विकास आराखड्यांतर्गत कामे पुढील चैत्र यात्रेपूर्वी पूर्ण करणार – चंद्रकांत पाटील

छायाचित्र- राज माकानदार , कोल्हापूर

कोल्हापूर – श्री जोतिबा परिसर विकासाचा 25  कोटीचा आराखडा करण्यात आला असून, 5 कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून जोतिबा विकास आराखडयांची तांत्रिक तसेच टेंडर प्रक्रीया येत्या आठवडाभरात पूर्ण केली जाईल. उर्वरीत 20 कोटी रूपये प्राधान्याने उपलब्ध करून घेवून श्री जोतिबा परिसर विकास आराखड्यांतर्गत सर्व कामे पुढील चैत्र यात्रेपूर्वी पूर्ण करणार असल्याचं, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल आहे.

ते  ज्योतिबा यात्रेनिम्मित श्रीक्षेत्र जोतिबा  वाडी रत्नागिरी इथे आले असताना बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन  राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिकं येवू दे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळू दे, अशी प्रार्थना जोतिबाच्या चरणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)