जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरीत गर्दी; आज यात्रेचा मुख्य दिवस

कोल्हापूर-  ‘चांगभलं ’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. आज (शनिवारी) यात्रेचा मुख्य दिवस आहे. मानच्या सर्वच सासन काट्या गडावर दाखल झाल्या आहेत.

गुरुवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर गुरुवारीच फुल्ल झाल्याचे चित्र होते.अनेक मानाच्या सासनकाठ्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरसह परिसरातून पायी जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. मात्र  बैलगाडीतून जाणाऱ्या भाविकांची संख्या यंदा रोडावली आहे.पर्याय म्हणून बीड, उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, बार्शी, सोलापूर,आदी भागांतून अनेक भाविकांनी खासगी आरामबसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. अशा बसेसची ये-जा गुरुवारी दिवसभर पंचगंगा नदी परिसरात सुरू होती.

संग्रहीत छायाचित्र

‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने पंचगंगा घाट बहरून गेला आहे. भाविकांची गर्दी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि प्रशासनातर्फे घाटावर देण्यात आलेल्या सोयी-सुविधांमुळे घाटाला यात्रेचे स्वरूप आले आहे.‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला देशातील विविध राज्यांतून भाविक येतात. तिथे जाण्यापूर्वी अनेक भाविक पंचगंगा नदीघाटावर थांबतात. मैलोन्-मैल चालत आल्याने आलेला शीण घालविण्यासाठी पंचगंगेच्या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर भाविक ‘दख्खनच्या राजा’च्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होतात.त्यामुळे गुरुवारी दिवसभर सासनकाठी नाचवत, ‘चांगभलं’चा गजर आणि गुलालाची उधळण करत हे भाविक पंचगंगा घाटाकडे येत होते. भाविकांच्या सोयीसाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल नदीघाटावर उभारण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीनेही घाटावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)