“जोडी रन’ स्पर्धेत जावळीकर सुसाट

देशातील प्रथमच “जोडी रन’चा यशस्वी प्रयोग

मेढा, दि. 25 (प्रतिनिधी) – “जोडी रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी मेढा येथे आयोजन करण्यात आले होते. जावली तालुकाच नव्हे तर जिल्ह्यासह पुण्या-मुंबईतील स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदविला. हजारो स्पर्धकांच्या सहभागाने तसेच जिल्हावासियांच्या उपस्थित पार पडलेल्या या अनोख्या “जोडी रन’ स्पर्धेने एक नवीन इतिहास घडविला आहे. बहुधा देशातील ही पहिलीच मॅरेथॉन आहे.
गेले महिनाभर या जोडी मॅरेथॉनची केवळ मेढ्यात नाही तर सातारा, पुणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील धावपटूंच्या कुतूहलाचा विषय बनून गेला होता. त्यामुळेच या जिल्ह्यांसह राज्याच्या विविध भागांतून धावपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी तब्बल 500 जोड्या सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये पुरुष-पुरुष गटात 18 ते 34 वयोगटात प्रथम क्रमांक अंकित नवगसे – वैभव कोकीळ या जोडीने पटकावला. द्वितीय क्रमांक ऋषीकेश धनावडे – नितीन शिर्के या जोडीने तर तृतीय रोहित शेळके – राहुल यादव या जोडीने पटकावला.
35 ते 49 गटात प्रथम. क्रमांक सुहास अम्राले -ओम शेलार या जोडीने तर द्वितीय क्रमांक रोहित भोसले -कार्तिक भोसले, तृतीय क्रमांक सुभाष भोसले -महादेव लेंभे या जोड्यानी पटकावले.
50 पासून पुढे खुल्या गटात भानुदास निकम – महेश निकम ही जोडी अव्वल आली तर द्वितीय लहुबा खामकर -बाबुराव जाधव या जोडीने पटकावला.
या स्पर्धेचा सर्वात आकर्षण असणारा स्त्री – पुरुष गट या गटामध्ये 18 ते 34 या गटात प्रथम क्रमांक दीपाली कारकर – ओंकार चव्हाण ही जोडी अव्वल आली तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे कोमल ओसवाल – महावीर ओसवाल आणि शीतल हांडे – प्रकाश हांडे या जोड्यानी पटकावले.
35 ते 49 वयोगटात रवींद्र जानकर – दीपाली यादव प्रथम तर दीपाली लकडे – वसंत लकडे, तृतीय माधुरी शिंदे – जयवंत शिंदे यांनी पटकावले.
खुल्या वयोगटात प्रथम क्रमांक भाविका मुथा – मिलिंद हळवे, द्वितीय डॉ. हर्षदा पटवर्धन – डॉ. भास्कर पटवर्धन या जोडीने तर तृतीय क्रमांक डॉ. अनुराधा दिवेकर – डॉ कमलाकर दिवेकर या जोडीने पटकावले.
महिला-महिला या गटामध्ये मध्ये 18 ते 34 वयोगटात प्रथम क्रमांक अपर्णा शेटे – अपर्णा केंजले, द्वितीय क्रमांक प्रियांका चिकणे – प्रतीक्षा भिलारे तृतीय क्रमांक पूनम शेलार – कोमल पवार या जोड्यांनी पटकावले.
35 ते 49 वयोगटात प्रथम क्रमांक अलिनाश मुलाणी-स्मिता माने द्वितीय विजया कदम -सुप्रिया मोरे तर तृतीय क्रमांक आर्या साळुंखे -अमृता साळुंखे यांनी पटकावले तर ओपन महिला- महिला गटात प्रथम क्रमांक अश्विनी शिंदे -वृषाली शिंदे तर द्वितीय क्रमांक स्वाती देवर्षि -श्रद्धा देवर्षि यांनी पटकावले.
दिव्यांग, मतिमंद विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग नोंदवीत स्पर्धा पूर्ण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या प्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, नगराध्यक्ष द्रौपदा मुकणे, तहसीलदार रोहिणी आखाडे, मेढा पोलिस स्टेशनचे सपोनि. जीवन माने, प्रसिध्द धावपटू डॉ. सुधीर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)