जोगवडी येथे जागतिक हिवताप दिन साजरा

जोगवडी – प्राथमीक आरोग्य केंद्र जोगवडीअंतर्गत भोर तालुका आरोग्य अधिकारी कराळे आणि वैद्यकीय अधिकारी जोगवडी डॉ. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.
यावेळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली आणि हिवताप आजाराचे लक्षणे, चिन्हे, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली.25 एप्रिलला जगभरात जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने तयारी हिवतापास हरविण्याची’ हा संदेश जगभरात दिला. डासांमुळे पसरणाऱ्या हिवतापासारखा आजार किटकजन्य आजाराशी संबंधित आहे. याचे गांभीर्य लक्षात आणून द्यायचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटनेने केला. या कार्यक्रमामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जोगवडीमधील कर्मचारी, प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी गावामध्ये प्रभातफेरी काढली. गावामधील नागतिकांना डासांमुळे हिवताप होतो, हिवतापाची लक्षणे यावर उपाय याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. हिवतापावर नियंत्रण आनण्यासाठी कुलर, बॅरल, डबे अथवा अन्य वस्तूंमध्ये सात दिवसांपर्यंत पाणीसाठी न करण्याचा आणि गावाशेजारील डबक्‍यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमास आरोग्य सहाय्यक कैलास भोसले, योगेश बांदल, कृष्णांत जगताप, शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हिवताप निर्मूलनासाठी सर्वांनी शपथ घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)