जोकोविच, निशिकोरी, सिलिच उपान्त्यपूर्व फेरीत

सर्बियाचा माजी विजेता नोव्हाक जोकोविच, क्रोएशियाचा सातवा मानांकित मेरिन सिलिच आणि जपानचा 21वा मानांकित केई निशिकोरी या खेळाडूंनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र फेडररच्या सनसनाटी पराभवामुळे जोकोविच विरुद्ध फेडरर ही उपान्त्यपूर्व फेरीतील लढत पाहण्याची जगभरातील टेनिसशौकिनांची संधी हुकली.

सहाव्या मानांकित जोकोविचने पोर्तुगालच्या बिगरमानांकित जोआव सौसाचे आव्हान 6-3, 6-4, 6-3 असे मोडून काढत आगेकूच केली. जोकोविचसमोर आता फेडररला चकित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित जॉन मिलमनचे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वीच विम्बल्डन स्पर्धा जिंकून जोकोविचने 54 आठवड्यांचा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. आता सलग दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम विजेतपदाची त्याला संधी आहे.

दरम्यान मेरिन सिलिचने बेल्जियमच्या 10व्या मानांकित डेव्डि गॉफिनचा कडवा प्रतिकार 7-6 (8-6), 6-2, 6-4 असा मोडून काढताना आगेकूच केली. सिलिचसमोर उपान्त्यपूर्व फेरीत 21व्या मानांकित केई निशिकोरीचे आव्हान आहे. निशिकोरीने जर्मनीच्या फिलिप कोहेलश्रिबरचा 6-3, 6-2, 7-5 असा सरळ सेटमध्ये फडशा पाडला. मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षीची अमेरिकन ओपन आणि यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनला मुकलेल्या निशिकोरीला सिलिचविरुद्ध 2014 मध्ये पत्करलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)