जॉर्ज फर्नांडिस यांच्या कारकीर्दीत संरक्षण क्षेत्राची प्रगती

– एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

पुणे – माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत बरेच वेळा संवाद साधला होता. प्रत्येक कामाशी जोडून घेणारे, संरक्षण क्षेत्राबाबत अतिशय रस घेऊन काम करत असत. विशेषत: सियाचीन प्रदेशात भारतीय सेनेला सक्षम बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यांच्या कारकीर्दीत संरक्षण क्षेत्राची अतिशय चांगली प्रगती झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मला आजही अतिशय चांगल्याप्रकारे आठवत आहे. 26 जानेवारी 2001 साली दिल्लीत प्रजासत्ताक दिवस झाला. सर्व कार्यक्रम आटोपतो नाही, तोपर्यंतच भूजमध्ये भूकंप झाल्याची बातमी मिळाली. फर्नांडिस हे त्यावेळी संरक्षण मंत्री होते. ही बातमी समजताच त्यांनी स्वत: डॉक्‍टरांची एक तुकडी सोबत घेऊन भूजकडे प्रस्थान केले. त्यावेळी मी देखील त्यांच्यासोबत होतो. नागरिकांबद्दल त्यांनी असणारी काळजी, त्यांना मदत करण्याची धडपड आणि यंत्रणेवरील त्यांची देखरेख हे सर्व त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवले. त्यातूनच फर्नांडिस यांच्याबद्दल आदर निर्माण झाला होता. त्यांच्या जाण्याने आपण एक चांगला नेता गमावला याबाबत वाईट वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)