जॉन बोल्टन अमेरिकेचे नवे सुरक्षा सल्लागार 

वॉशिंग्टन : जॉन बोल्टन अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होणार आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. बोल्टन हे एचआर मॅकमास्टर यांची जागा घेतील. ते संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिले आहेत. पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इराणबद्दल स्वतःच्या कठोर भूमिकेसाठी त्यांना ओळखले जाते. उत्तर कोरिया आणि इराणमध्ये सैन्य कारवाईची मागणी त्यांनी या अगोदरच केली होती.

बोल्टन यांनी अमेरिकेची वृत्तवाहिनी फॉक्स न्यूजमध्ये विश्लेषक म्हणून काम केले आहे. मागील वर्षी वाहिनीवर बोलताना त्यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेचा विजय किंवा पराभव हा पाकिस्तानवर निर्भर असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानकडे अण्वस्त्रs असून तो सातत्याने इस्लामिक कट्टरवाद आणि दहशतवादाला बळ देतोय. तो अण्वस्त्रांची शक्ती असणाऱया दहशतवादी देशाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे विधान त्यांनी केले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)