जैशच्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या परिसराला सुरक्षा दलांनी वेढले. त्यानंतर आज सकाळपासून दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडे सापडलेल्या सामग्रीमुळे ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले. ते जैशचे सदस्य असल्याची माहितीही समोर आली. सुदैवाने चकमकीत सुरक्षा दलांची आणि नागरी बाजूची कुठलीही हानी झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)