जैशच्या दहशतवाद्याला देशाच्या राजधानीत अटक 

प्रजासत्ताक दिन सोहळ्यावेळी हल्ल्याचा कट उधळला 

नवी दिल्ली  – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या सदस्याला देशाची राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. त्यामुळे प्रजासत्ताक दिन सोहळ्यावेळी दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उधळला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीनगरप्रमाणेच दिल्लीतील वर्दळीच्या भागांत ग्रेनेड हल्ले घडवण्याचा कट जैशने रचल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तातडीने हालचाली करत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 20 जानेवारीच्या रात्री जैशच्या दहशतवाद्याला पकडले. अब्दुल लतिफ गनई उर्फ उमैर उर्फ दिलावर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे काही संशयास्पद सामग्री सापडली. मात्र, त्याचा तपशील देण्यात आलेला नाही.

दिलावारच्या अटकेबाबतची माहिती जम्मू-काश्‍मीर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्रीनगर पोलिसांनी हिलाल नावाच्या आणखी एका दहशतवाद्याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले. दहशतवादी हल्ल्यासाठी हिलालने दिल्लीतील काही भागांची टेहळणी केल्याचे उघड झाले. दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्‍मीरला जाऊन हिलालला ताब्यात घेतले. दिलावार आणि हिलालच्या अटकेनंतर जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आणखी काही दहशतवाद्यांना पकडल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)