जैवविविधता राखण्यासाठी करणार ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’

पुणे – “”नद्या, तलाव, जंगले, प्राणी-पक्षी या सर्वच घटकांचा जैवविविधतेत समावेश होतो. ही जैवविविधता टिकविण्यासाठी केवळ कोणत्याही एका घटकाचा विचार करणे पुरेसे ठरणार नाही. सर्व पर्यावरणीय घटकांचा एकत्रित विचार करून त्यांच्या संवर्धनाचा विचार होणे आवश्‍यक आहे. यासाठीच आगामी काळात पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या साहाय्याने जैवविविधतेचे व्हिजन डॉक्‍युमेंट तयार करणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले.

13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत “पुणे महानगरातील जैवविविधता’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. संजीव नलावडे, प्राणीशास्त्रज्ञ डॉ. संजय खरात, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य डॉ. अंकुर पटवर्धन, पुण्याच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., पर्यावरणतज्ज्ञ डॉ. श्रीकांत इंगळहळीकर, पुण्याच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, महापालिकेचे पर्यावरण विभागप्रमुख मंगेश दीघे आणि वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पुण्याचे पर्यावरण याविषयावर बोलतानाच या पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले होते. ही बाब लक्षात घेत, शहराच्या जैवविविधता समितीतर्फे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी “व्हिजन डॉक्‍युमेंट’ तयार केले जाणार आहे.

याबाबत डॉ. पुणेकर म्हणाले, “पुण्याचे पर्यावरण टिकवायचे असेल, तर त्यासाठी सर्वच पर्यावरणीय घटकांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. याची नोंद घेत जैवविविधता समितीतर्फे सर्व घटकांच्या एकात्मक संवर्धनासाठी एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर राज्यातील इतर शहरांमध्येही हा आराखडा राबविण्यासाठी उपयुक्‍त ठरेल यावर आमचा भर राहणार आहे. त्यासाठी शहरातील पर्यावरणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांना सामाविष्ट करून घेतले जाईल. या व्हिजन डॉक्‍युमेंटसाठी सहयोग देण्याचे सर्वच तज्ज्ञांनी मान्य केले आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)