जैवविविधता राखण्यासाठी आता ‘डिजिटल’ व्यासपीठ

पुणे – शहरातील जैवविविधतेच्या नोंदीसाठी महापालिकेच्या जैविक विविधता समितीतर्फे “डिजिटल’ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तुम्हाला माहिती असलेल्या पर्यावरणीय घटकांची माहिती महापालिकेच्या या संकेतस्थळावर माहिती भरून जैवविविधतेच्या संवर्धनात तुमचा हातभार लावता येईल.

महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे शहरातील जैवविविधतेची नोंद घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी “डाटामीट’ या स्वयंसेवी समूहाच्या निखील व्ही. जे. यांनी महापालिकेच्या सहकार्याने पर्यावरणाबाबत योगदान देण्यासाठी जैवविविधतेच्या नोंदीसंदर्भातील एक संकेतस्थळ विकसित केले आहे. महापालिकेच्या “इंद्रधनुष्य पुणे’ या अधिकृत संकेतस्थळावर या नोंदीसाठी “बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ हे एक स्वतंत्र टॅब उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये नागरिक त्यांना माहिती असलेल्या आणि शहरात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या प्रजातींची माहिती नोंदवू शकतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पर्यावरण विभागप्रमुख आणि जैविक विविधता समितीचे सचिव मंगेश दीघे म्हणाले, “शहरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आधी या घटकाची माहिती उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच समितीतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जैवविविधतेबाबत प्राथमिक माहितीचे संकलन हे याचे प्रमुख उद्दिष्ट असणार असून, त्यानंतर तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने या माहितीचे परीक्षण करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. या माहितीच्या आधारावर जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत नियोजन करण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)