जैवविविधता नष्ट होणे खेदजनक ः डॉ. बाचुळकर

पश्‍चिम घाट जैवविविधता चर्चासत्र 
 
पुणे – “अभयारण्ये आलीत तर विकासाचे मार्ग खुंटतील अशी भावना स्थानिकांमध्ये रुजवून त्यांची दिशाभूल केली जात आहे. पश्‍चिम घाटात हजारो वर्षे गेल्यानंतर तयार झालेली जैवविविधता ज्या प्रकारे नष्ट होत आहे ते खेदजनक आहे. पश्‍चिम घाटाच्या बाबतीत आपण जी उदासीनता दाखवित आहोत, त्यावरून केरळ पाठोपाठ गोवा आणि महाराष्ट्रदेखील नैसर्गिक आपत्तीच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे खेदाने म्हणावसे वाटत आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केले.

13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त डॉ. बाचुळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महोत्सवाच्या संयोजक सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या. डॉ.बाचुळकर म्हणाले, “आपण वृक्षरोपणाचे कार्यक्रम आखतो. त्यानुसार वृक्षारोपण करतो; परंतु जंगल वसवू शकत नाही. तसेच जैवविविधता देखील तयार करू शकत नाही. त्यामुळे आहे ती जंगल आणि जैवविविधता वाचविणे, टिकवणे, त्यांचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. यासाठी इको सेन्सेटिव्ह झोनची पुनर्स्थापना होणे आवश्‍यक असून, निसर्गामधील मानवाचा वाढता हस्तक्षेप रोखला पाहिजे. हा मानवी हस्तक्षेप न थांबल्यास मानवाच्या आस्तित्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहे.’


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)