जैवविविधता, आरोग्याला जलपर्णीचा ‘विळखा’

मुळा-मुठा नदी परिसरात विस्तार वाढल्याचे चित्र


आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

पुणे : नदीच्या जैवविविधतेला तसेच मानवी आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या जलपर्णींचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजन करूनही हे प्रमाण कायम असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नदी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मुळा-मुठा नदीत जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. ही जलपर्णी पर्यावरणासाठी तसेच आरोग्यासाठी घातक आसल्याने वेळोवेळी ती साफ करणे आवश्‍यक असते. हे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी या जलपर्णीचा विस्तार वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने औंध, बोपोडी, डेक्‍कन परिसर आदी भागांचा समावेश आहे. या जलपर्णीमुळे नदीतील जैवविविधतेला धोका होतो. त्याचबरोबर डासांची उत्पत्ती आणि दुर्गंधी यामुळ परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, महापालिकेकडून जलपर्णी क्‍लाढण्यासाठी कंत्राटी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत बहुसंख्य ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. मूळात नदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन हद्दीतून वाहाते. शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या नदीतील जलपर्णी काढली जाते. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत वारंवार माहिती देवून देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)