जैन विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

पिंपरी – भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालयात बालवाडी ते चौथीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अ

ध्यक्षस्थानी जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे प्रकल्प संघटक के. बी. वाळके उपस्थित होते. ग्रामीण विकास या विषयात त्यांचा 25 वर्षांचा अनुभव आहे. व्यासपीठावर महापालिका शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षिका अनिता जोशी, केंद्र समन्वयक सुनिता खोड, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, पर्यवेक्षक श्रीकांत कदम, बजाजच्या केंद्र समन्वयक अनघा दिवाकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, पालक संघ उपाध्यक्षा मोनिका शेळके आदी उपस्थित होते.

विद्यार्थिनी प्राची व कार्तिकी शिंदे, पालक संघाच्या उपाध्यक्षा मोनिका शेळके, प्रतिनिधी रोहिणी वडमारे, मुख्याध्यापक संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या शिक्षिका अरूणा धिवार आणि स्नेहलता वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विलास गुंजाळ यांनी केले. शिक्षिका दीपिका सावंत, शैला बर्वे, रेखा दंताळे, सुवर्णा जाधव, प्रदीप बोरसे, सुषमा शिर्के, सुनिता साळवे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)