जैन इंटरनॅशनलच्या महिला विभागातर्फे आज कार्यक्रम

मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्‌घाटन : “रुबरू’ विशेष प्रदर्शन

पुणे – “जितो’ अर्थात “जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’च्या महिला विभागातर्फे मंगळवारी (दि.17) “रुबरू’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उद्योग-व्यवसायाद्वारे सक्षम होऊ पाहणाऱ्या महिलांना व्यासपीठ देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारती भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी “जितो’चे अध्यक्ष विजय भंडारी, दीपाली बाफना, नीता मेहता आदी उपस्थित होते.

“जितो’तर्फे महिला सबलीकरणासाठी विविध प्रदर्शने, उपक्रम, कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास शिबिरे आयोजित केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून “रुबरू’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प येथील हॉटेल अरोरा टॉवर येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. या प्रदर्शनात पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, इंदोर अशा विविध शहरांधील महिला व्यावसायिकांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये आरोग्य, आहार-विहार, पौष्टिक उत्पादने, फॅशन डिझायनर, हॅण्डीक्राफ्टस्‌, पाळीव प्राण्यांचे खाद्य, इंटिरीअर डिझाईन, इन्स्टंट मिक्‍स, ज्वेलरी यासह अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा अंतर्भाव असणार आहे. मुख्यतः महिलांच्या अर्थविषयक ज्ञानात भर घालण्यासाठी आर्थिक नियोजनाविषयीचा महत्त्वपूर्ण स्टॉल, विविध प्रकारच्या विम्यांची माहिती देणारे स्टॉल, तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी असलेल्या सरकारच्या विविध योजना आणि परवाने यांची माहिती देणारे स्टॉल देखील याठिकाणी असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)