करंजी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन
कोपरगाव –” जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होत आहे. निवडणुकीपूर्वी जे बोललो ते करून दाखविले असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विमलताई आगवण होत्या. ब्राम्हणगाव गटाच्या सदस्या विमलताई आगवण यांच्या विकास निधीतून करंजी जिल्हा परिषद शाळा खोली भूमिपूजन, स्मशानभूमीचे काम तसेच ओगदी येथील जिल्हा परिषद नूतन शाळा खोलीच्या कामाचा शुभारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आघाडीची सत्ता असल्यामुळे विकासाच्या बाबतीत ग्रामीण भागात एकाच वर्षात मोठा बदल घडून आला आहे. जिल्हा नियोजन समितीवर 32 सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हे एकट्या कोपरगाव तालुक्यातील असल्यामुळे विकास कामांना वेग आला असून यापुढेही कोपरगाव तालुक्याच्या विकासकामांमध्ये सातत्य ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, शिक्षणाधिकारी शबाना शेख, बांधकाम विभागाचे क्षीरसागर, नाना आगवण, सांडूभाई पठान, रोहिदास होन, कारखान्याचे संचालक संजय आगवण, गौतम बॅंकेचे संचालक अनिल महाले, सरपंच छबू आहेर, ग्रामसेवक गुंड, आबा शिंदे, नाथा आगवण, भास्कर शहाणे, दत्तू बोठे, नवनाथ आगवण, केशवराव चरमळ, मुकुंद आगवण, गोपाल कुलकर्णी व करंजीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा